भ… भवितव्याचा!
शिक्षणव्यवस्थेविरुद्ध लढा हा पूर्वीपासून चालत आला आहे. पूर्वी काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजकाल कायद्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणातील नेमके मर्म काय याबाबतीत वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर; जेव्हा व्यक्ती सक्षम होऊन कारकीर्द घडवण्याच्या मार्गावर असतो तेव्हादेखील त्याचे मार्गदर्शन न झाल्याचे जाणवते. बहुतांश भाग ग्रामीण असून भारतामध्ये भवितव्याच्या केवळ ठराविक दिशाच …